
राजकारण्याना आता निवडणूक ज्वर चढू लागला आहे. जे नेते सभ्य भाषा वापरण्यासाठी प्रसिद्ध होते तेही आता कोपरखळी, धोबीपछाड हे प्रकार वापरू लागले आहेत. गेली तीन वर्षे तुरुंगात व तुरुंगाबाहेर असलेले कलमाडीही राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देवू लागले आहेत. सध्या कलमाडी तुरुंगाबाहेर आहेत पण ते जामिनावर आहेत. पण आता त्यांना वाटू लागले आहे की,आपण पुन्हा पहिल्याप्रमाणे निवडणुकीत उतरू शकतो. आठवड्यात जाणता राजा शरद पवार आणि त्यांचे एकेकाळचे शिष्योत्तम सुरेश कलमाडी यांची सहज बोललेली विधाने राजकीय दृष्टीने महत्वाची ठरली. शरदराव पवार यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या चरित्राच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने असे विधान केले की, विलासराव हे समोरच्या माणसाच्या मनातील जाणणारे गृहस्थ होते. त्याला काय हवे आहे हे त्यांना सांगावे लागत नसे. त्यांची निर्णय घेण्याची पद्धतीही व्यवस्थित होती. हे सांगताना ते असे म्हणालेे ‘पण सध्याच्या शासनातील माणसांना काय झाले आहे हे कळत नाही. कारण अनेक महिने त्यांच्या फायली पडलेल्या असतात. त्यांच्या हाताला लकवा भरला आहे काय असे वाटू लागते.’ वास्तविक विरोधी पक्षावरही अशी टिपणी करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. अर्थात त्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले की, जी कामे नियमबाह्य आहेत त्यावर निर्णय घेताना विचारच करावा लागतो. याखेरीज काही उत्तर देणे आवश्यक वाटल्यास आपण योग्य वेळी देवू. यात शरदराव यांनीही मुख्यमंत्र्यांचे नाव घेतले नाही आणि मुख्यमंत्र्यांनीही शरदराव यांचे नावे घेणे टाळले. वृत्तपत्रात आणि वाहिन्यावर गाजलेला हा संवाद सर्वाना माहीत आहे. पण यातील न पुढे आलेली बाब म्हणजे दोन्ही पक्षातील संवाद जवळ जवळ संपला आहे. निरनिराळ्या समित्यांच्या बैठकांच्या निमित्ताने मंत्री आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकारी एकत्र येतात व बोलतानाही पण संवाद संपला आहे. जेवढा अन्य राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद होतो तेवढाही संवाद या सत्तेत सहभागी असलेल्या पक्षांच्या प्रतिनिधींचा राहिलेला नाही.
या वर्षी पुणे फेस्टिव्हल आणि उपमहापौरपदाची निवडणूक कलमाडी यांच्या विधानानेच गाजली. पुणे फेस्टिव्हलमध्ये कलमाडी यांनी सांगून टाकले की, पुढील तीन महिन्यात सारे चित्र स्पष्ट होणार आहे आणि मी पुणेकरांना खाली बघायला लावणारे असे काहीही केलेले नाही हे स्पष्ट होईल. महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी आहे. त्यामुळे महापौर राष्ट्रवादी व उपमहापौर काँग्रेस असे ठरलेही होते त्यानुसार सुनिल गायकवाड हे निवडूनही आले. पण यातील अनपेक्षित गंमत म्हणजे सभागृहात सुरेश कलमाडी आले व त्यांनी सांगून टाकले की, उपमहापौर यांच्या निवडणुकीत मी महत्वाची भूमिका घेतलेली आहे.
कलमाडी हे सभागृहात येताच त्यांच्या सुमारे चाळीस पाठिराख्यांनी त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यास सुुरुवात केली. त्याच बरोबर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अजितदादा यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यास सुुरुवात केली. हेही प्रसंग महापालिका निवडणुकीत नेहेमी दिसणारा आहे. पण याच्या पुढे असे घडल की, कलमाडी हे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पुढे केले व अजून जोराने घोषणा द्या, माझे हात लांबपर्यंत पोहोचले आहेत. मी राजकारणातून निवृत्त होतो आहे असे जर कोणाला वाटत असेल तर चूक आहे. मी गेल्या वीस वर्षाप्रमाणे परत महापालिकेत येत आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना कलमाडी म्हणाले की, गेली दोन वर्षे मी काही बोलण्याच्या स्थितीत नव्हतो कारण कोणी ऐकण्याच्या स्थितीतच नव्हते पण मी एक दोन महिन्यात सारी परिस्थिती समोर येईल व मी माझ्या मतदारांची आणि पुणेकरांचीही मान खाली जाईल, असे काहीही वर्तन केलेले नाही. हे स्पष्ट होईल. त्यानंतरच्या अनौपचारीक चर्चेत त्यांनी असेही सांगून टाकले की, मी लोकसभेची निवडणूक लढविणार आणि बहुतांशी काँग्रेसच्या वतीनेच लढविणार पण आता परिस्थिती इतकी साफ दिसू लागली आहे की, मी राजकारण सोडून जाण्याचे कारणच नाही.
कलमाडी यांच्या म्हणण्यानुसार त्यंाच्यावरील आरोपाबाबत एक दोन महिने वाट बघावी लागणार असेल तर ती बघावी लागेल पण ते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा संयोजनेचे अध्यक्ष होते आणि त्या स्पर्धा संपण्यापूर्वीच पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी सांगून टाकले होते ‘त्यांची’ जागा ही संसद किंवा संघटनेचे पदाधिकारी ही नसून तिहारजेल आहे. अर्थात शरद पवार यांनी ज्या प्रमाणे गेल्या आठवडयात नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर टीका केली तीच काळजी पंतप्रधानांनी घेतली पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराची कारवाई सुुरु केली. त्यातून ते नऊ महिने तिहार जेलमध्ये होते. कलमाडी हे कोणत्याही क्रीडा संस्थेची निवडणूक लढवणार नाहीत अशी काळजी घेतली होती. त्यांच्याकडे पक्षाचे संसदीय चिटणीसपद होते ते तर काढलेच पण त्यांचे पक्ष सदस्यपदही काढले. गेली तीन वर्षे त्यांच्या भेटीगाठीवरीही जवळ जवळ बहिष्कारही होता. पण गेल्या आठवड्यापासून ते पुन्हा निवडणुकीत उतरण्याची भाषा करू लागले आहेत.
त्यांच्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सीबीआयने जरी त्यांना अटकेत टाकले तरी त्यांच्या विरोधात भक्कम पुरावे दाखल केलेले नाहीत. न्यायाधिशांनी स्पष्टपणे विचारले की, त्यांच्याविरोधात पैसे गैरव्यवहाराचे नेमके आरोप काय आहेत त्याचे पुरावे दाखल करा, त्यावर सीबीआयने मौन राखले आहेत. सार्या आरोपातून एकच मुद्दा पुढे येताना दिसतो आहे की, एका ऑस्ट्रेलियन कंपनीला क्रीडास्पर्धातील एका सेकंदाचा अतिसूक्ष्मभाग येवढे वेळेचे प्रमाण मोजण्याचे काम देण्याप्रकरणी चौर्याण्णव कोटी रुपये जादा दिले गेले आहेत तो आरोप सोडून कोणत्याही आरोपात ते सापडलेले नाहीत आणि त्या कंपनीचे काम एकदा त्यांनी अनामत रक्कम नसल्याने नाकारले व नंतर ती रक्कम भरल्यावर दिले बाकी अनेक आरोप त्यांच्यावर जाहीर होत असले तर त्याची कोणतीही जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. ऑस्ट्रेलियन कंपनीबाबतही भ्रष्टाचाराची केस होणार नाही तर एका सेकंदाचे अतिसूक्ष्म भागाचे चित्रण करणारे शेकडो कॅमेरे असणारही ती कंपनीच आजपर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे चित्रकरण करण्याच्या कामात टिकली आहे.
सध्या असा संकेत मिळत आहे की, पक्षाची स्थिती जर इतकी गंभीर आहे तर मग कलमाडी दुखावला आणि त्यांनी अजूनही काही जागावर अडचणी निर्माण केल्या तर त्याचे नुकसान अधिक होईल, काँग्रेसच्या वरीष्ठांचे मत झाले आहे. याबाबत आज असे स्पष्ट वाटत आहे की, कलमाडी काँग्रेसमध्ये असले तरी किंवा नसले तरी त्यांच्यावरील आरोप ही निवडणुकीतील एक महत्वाची कार्यक्रम पत्रिका असणार आहे.