युवराजची आक्रमक फलंदाजी

बेंगलोर : वेस्ट इंडिज अ संघाला भारत दौ-यातल्या पहिल्याच वन डे सामन्यात युवराजसिंग आक्रमक फलंदाजीचा जोरदार तडाखा बसला. बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारत अ संघानं विंडीज अ संघाचा ७७ धावांनी धुव्वा उडवला. युवराजने अवघ्या ८९ चेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांसह केलेली १२३ धावांची खेळी केली. त्यानतर दमदार फलंदाजीमुळे भारत अ संघाच्या विजयाचे मुख्य वैशिष्ट्य ठरली.

टीम इंडियातून डावललेल्या युवराजला राष्ट्रीय निवड समितीने दिलेल्या लाइफलाईनचा त्याने नेमका लाभ उठवला. मनदीपसिंग आणि युसूफ पठाण यांनीही युवराजला छान साथ दिली. मनदीपने ७८ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकारासह ६७ धावांची, तर युसूफ पठाणने ३२ चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद ७० धावांची खेळी उभारली.

त्यामुळेच भारत अ संघाला ४२ षटकांत चार बाद ३१२ धावांची मजल मारता आली. त्यानंतर विंडीज अ संघाला ३९ षटके आणि एका चेंडूंत सर्व बाद २३५ धावांची मजल मारता आली.