दिलीप कुमार यांना ह्दयविकाराचा झटका

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना ह्दयविकाराचा सौम्य झटका आला असून, त्यांना उपचारासाठी वांद्रयाच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ह्दयविकार तज्ञ डॉ.नितीन गोखले त्यांच्यावर उपचार करत आहेत.

दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. दिलीप कुमार यांनी सहा दशकाच्या कारकीर्दीत साठहून अधिक चित्रपटात भूमिका केल्या आहेत.आपल्या अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणारे दिलीप कुमार पहिले अभिनेते आहेत. 1954 साली त्यांना हा पुरस्कार मिळाला.

भारतीय सिनेमाला दिलेल्या योगदानाबद्दल 1991 साली भारत सरकाने त्यांना पद्मभूषण तर, 1994 साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. गंभीर-विनोदी भूमिका अगदी सहजतेने वठवण्यात त्यांची हातोटी होती. अंदाज, देवदास, आझाद, मुगले-ए-आझम, गंगा जमुना या चित्रपटातील भूमिकांनी त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केले.

Leave a Comment