राहूल गाधीं यांच्या नावाची घोषणा शक्य ?

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेन्द्र मोदी यांच्या नावाची घोषणा करताच कॉंग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्याही नावाची अशीच घोषणा करण्याच्या हालचालु सुरू झाल्या आहेत. पण तशी घोषणा नेमकेपणाने करावी की नाही याबाबत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मनात चलबिचल सुरू असल्याचे वृत्त आहे. भाजपाने मोदी यांचे नाव जाहीर करून पहिले पाऊल टाकले आहे त्यामुळे भाजपातले मतभेद समोर आले असले तरीही त्यातून या पक्षाचा आत्मविश्‍वास प्रकट झाला आहे त्याचा फायदा भाजपाला मिळेल. तेव्हा तो तसा मिळू नये यासाठी आपणही राहुल गांधी यांचे नाव जाहीर करून भाजपाला उत्तर दिले पाहिजे असे काही नेत्यांचे मत आहे.

काही नेत्यांना हे मान्य नाही. कॉंग्रेसचा पंतप्रधानपदाचा उमेदवार आताच ठरत नसतो. पक्षाचे खासदार त्याची निवड करतात त्यामुळे नावाची घोषणा करण्याचा काही प्रश्‍नच नाही असे सांगून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा करणे टाळावे असे काही नेत्यांचे मत आहे. राहुल गांधी यांच्या नवाची घोषणा केली तर लोक मोदी आणि गांधी यांच्यात तुलना करतील व त्यातच मोदी भारी टळतील म्हणून घोषणा टाळावी असे त्यांना वाटते. म्हणून नावाची घोषणा तर करूच नये पण भाजपाने हे नाव आधीच जाहीर केलेय या पद्धतीवरच टीकेची झोड उठवावी असे त्यांचे मत आहे.

मोदी आणि गांधी यांच्यात तुलना होणे कॉंग्रेससाठी हिताचे नाही कारण मोदी अनेक बाबतीत गांधींपेक्षा भारी आहेत. मोदी हे सलग तीन निवडणुकांता चांगल्या मतांनी निवडून ़आले आहेत आणि त्यांना तेरा वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आहे.राहल गांधी यांना पराभवाची परंपरा आहे आणि प्रशासनाचा अनुभव नाही. अशी तुलना झाल्यास मोदी यांचे पारडे जड होईल अशी भीती त्यांना वाटते.