‘बिग बॉस’मध्ये झळकणार अरमान कोहली, तनीषा मुखर्जी

बिग बॉसमध्ये सहभागी होणार असलेल्या १५ जणांची अंतिम यादी समजली असून त्यामध्ये अभिनेता अरमान कोहली याच्यासह अभिनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जी सहभागी होणार आहे. त्या‍सोबतच बालिका वधू मालिकेतून गाजलेली अभिनेत्री प्रत्युषा बनर्जी देखील सहभागी होणार आहे.

डेविल आणि एंजलची थीम असलेला ‘बिग बॉस -७’ रविवारपासून सुरू होत आहे. यामध्ये कोण कोण सहभागी होणार याची उत्सुकता आतापासूनच सर्वानांच लागून राहिली आहे. यामध्ये सहभागी होत असलेल्या काही स्पर्धकाची नावे पूर्वीच समजली होती. त्यामध्ये अनिता आडवाणी, अपूर्व आणि शिल्पा अग्निहोत्री यांच्या नावाची चर्चा सुरूवातीपासून सुरू आहे. फायनल कंटेस्टेंट्सच्याच यादीतही त्यांच्या नावाचा समावेशकरण्यायत आला आहे. त्यांच्या शिवाय कुशल टंडन, हेजल कीच, गौहार खान, रजत रवैल, प्रत्युषा बनर्जी, वीजे ऐंडी, अरमान कोहली, तनीषा मुखर्जी (काजोलची बहिण), एली एवराम, रतन राजपूत आणि संग्राम सिंह सहभागी होणार आहेत.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’च्या घरात एकूण ३० कंटेस्टेंट्समधून १५ जणांचे नावे फायनल करण्यात आली आहेत. हे सर्व १५ स्पर्धक शनिवारी सकाळीच बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत.