बंगळुरू – फॅशनेबल व उत्तेजक पोषाखामुळे कार्यालयीन वातावरण बिघडू नये यासाठी कर्नाटक सरकारने सर्व सरकारी कर्मचा-यांच्या पोषाखावर काही बंधने आणली आहेत. यापुढे कर्नाटकातील सर्व सरकारी कर्मचा-यांना संपूर्ण अंग झाकले जाईल असा पोषाख परिधान करुन कार्यालयात यावे लागणार आहे.
कर्नाटकच्या सरकारी बाबूना पोषाखाचे बंधन
पुरुष कर्मचा-याना फॉमर्ल शर्ट-पॅँट आणि महिलांना साडी किंवा चुडीदार परिधान करणे बंधनकारक केले आहे. सरकारी कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांच्या पोषाखांमध्ये एकसारखेपणा हवा यासाठी सरकारने हा नियम लागू केला आहे. याची अधिसूचना सरकारने 12 सप्टेंबर रोजी जारी केली.
सरकारी नोकरीत नव्याने लागलेले कर्मचारी मंत्रालयाच्या प्रतिमेला साजेसा नसलेला पोशाख घालतात. त्यामुळे सरकारी कर्मचा-यांच्या संघटनेने पोशाखाचे बंधन घालण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यानंतर सरकारच्या कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाने अधिसूचना जारी करून पोषाखाचे बंधन लादले आहे.
