कमल हसन आणि गॅवरस यांना जीवन गौरव पुरस्कार

यंदाच्या पंधराव्या मुंबई चित्रपट महोत्सवात प्रसिध्द दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता दिग्दर्शक कमल हसन आणि विश्वप्रसिध्द फ्रेंच चिचपट निर्माता कोस्ता गॅवरस यांचा सर्वोच्च मानाच्या अशा जीवन गौरवपुरस्काराने सत्कार करण्यात येणार आहे. हा मोहत्सव 17 ते 24 ऑक्टोबर दरम्यान या मोहत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता कमल हसन आणि विविध पुरस्कारप्राप्त फ्रेंच चित्रपट निर्माते कोस्ता गॅवरस यांना हा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत असल्याच्या भावना सुप्रसिध्द चित्रपट निर्माता तसेच ‘मामि’ महोत्सवाचे अध्यक्ष शाम बेनेगल यांनी व्यक्त केल्या. या महोत्सवाचे आयोजन मुंबई अॅकेडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस (मामि) यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या सहयोगाने करण्यात आले आहे. तर ‘मामि’ महोत्सवाचे अध्यक्ष श्याम बेनेगल आणि महोत्सवाचे संचालक श्रीनिवासन नारायणन् यांनी बुधवारी आ जीवन गौरव पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्काराच्या निमित्ताने या दोन्ही दिग्गज कलाकार, चित्रपट निर्मात्यांशी त्यांच्या चाहत्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याने त्यांचे चाहत्यांमध्येही आनंद व्यक्त होत आहे.

यंदाच्या या मामि महोत्सवात 200 चित्रपट दाखवले जाणार असून तब्बल 65 देश या महोत्सवात सहभाग घेणार आहेत. हा महोत्सव मुंबईतील मेट्रो सिनेमा आणि लिबर्टी सिनेमा या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे तसेच अंधेरी येथील सिनेमॅक्समध्येही या महोत्सवाचे सॅटेलाईट वरुन घेतलेले व्हिडीओपाहायला मिळणार आहे.

Leave a Comment