ओबामांचा विक्रम मोदींनी मोडला!

मुंबई – गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे गुगलवरील सर्वाधिक लोकप्रिय नेता ठरले आहेत. सर्च इंजिन गुगलवर एका दिवसात नरेंद्र मोदींच्या नावाने एक अब्जाहून अधिक वेळा सर्च केल्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावे हा विक्रम होता. अमेरिकेतील निवडणूकांच्या वेळी बराक ओबामांचं नाव घोषीत झाल्यानंतर त्यांच्या नावे 98 लाख 77 हजार 332 वेळा (1,000,077,332 वेळा) सर्च केल्याची नोंद आहे. तर मोदींचे नाव एक अब्ज 77 हजार 332 वेळा सर्च केल्याची नोंद आहे.

मोदी हे देशातील सर्वात जास्त लक्षवेधी नेते ठरले आहेत. शुक्रवारी, लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध डावलून भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी बहाल केली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment