सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदी शिखर धवन

हैदराबाद- टीम इंडियाचा आघाडीचा दमदार फलंदाज शिखर धवनची टी-२० चॅम्पियन्स लीगमध्ये सनरायजर्स हैदराबादचे कर्णधार म्हणून निवड करण्यांत आली आहे. ही स्पर्धा १७ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मोहाली कसोटीत विक्रमी खेळी करून क्रिकेट विश्वात चमकल्यानंतर धवनने करिअरमध्येही वेगाने भरारी घेतली आहे.

आगामी काळात होत असलेल्याव टी-२० चॅम्पियन्से लीगमध्ये शिखर धवन सनरायजर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवणार आहे. आयपीएल-सहामध्ये हैदराबादचा कर्णधार राहिलेला श्रीलंकेचा कुमार संगकारा यावेळी मायदेशातील टीमकडून खेळणार आहे. त्यामुळे धवनला नेतृत्वा करण्याची संधी मिळाली आहे.

सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत तसे पाहिले तर असलेल्या‍ वेस्टइंडीजचा डॅरेन सॅमी आणि दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन तसेच जेपी ड्युमिनी यांची नावे शेवटपर्यंत चर्चेत होती. मात्र शेवटच्या क्षणी धवनने यामध्ये बाजी मारली आहे. आयपीएल-सहामध्ये धवन हैदराबादसाठी यशस्वी फलंदाज ठरला होता. धवनने दहा सामन्या त ३८ च्या सरासरीने सर्वाधिक ३११ धावा केल्या होत्या. त्यामुळेच त्याच्याकडे आता कर्णधार पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

Leave a Comment