अनिवासी भारतीय विद्यार्थ्याची हत्या

नवी दिल्ली – अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची दिल्लीत त्याच्या चौघा मित्रांनी हत्या केली. या चौघांनाही अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. हा विद्यार्थी अनमोल सामा हा न्यूयॉर्कमध्ये शिकत होता. सध्या तो दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागातील आपल्या घरी आला होता. तिथे रात्री तो आपल्या मित्रांसह पार्टीत दंग असतानाच एका मित्राने बियरची बाटली त्याच्या डोक्यात घातली. त्यात तो मरण पावला.

पार्टी सुरू असतानाच नशेत त्याचे आणि त्याच्या मित्राचे वाद सुरू झाले आणि त्यातूनच हा प्रकार घडला. डोक्यावर बाटलीचा आघात केल्याच्या अवस्थेत अनमोल त्या फ्लॅटच्या बाहेर आला आणि बाहेर येऊन कोसळला. त्याला उचलून रुग्णालयात नेले असता तिथे तो मरण पावल्याचे घोषित करण्यात आले.

अनमोल सामा याचे आईवडील सध्या परदेशी राहतात. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला. ते घर त्याच्या एका मित्राचे असल्याचे कळते. त्याच्या चौघा मित्रांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment