गोवा टूरिझमचा सनबर्न महोत्सव

पणजी – एका खाजगी पर्यटन संस्थेने गोव्यात २७ ते २९ डिसेंबरच्या दरम्यान पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी सनबर्न गोवा महोत्सव आयोजित केला आहे. गोव्याच्या पर्यटन उद्योगातील असे उपक्रम पणजीत केले जात असले तरी हा उत्सव मात्र पणजी येथे न होता पणजीपासून ९ किलोमीटर अंतरावरच्या उत्तर गोव्यातील कँडोलिम येथे होणार आहे. या उत्सवात कमीतकमी ३० हजार लोक सहभागी होतील असा अंदाज आहे आणि कँडोलिम जवळ एवढ्या गर्दीला सामावून घेणारी मोठी जागा नसल्यामुळे महोत्सवाची जागा बदलावी की काय यावर विचार सुरू झाला आहे.

गोव्याचे पर्यटन विकास मंत्री दिलीप परुळेकर यांनी सनबर्न उत्सवाला पाठिंबा दर्शविला आहे. हा उत्सव एका खाजगी पर्यटन संस्थेचा असला तरी राज्य सरकारचे पर्यटन खाते त्याकडे आपलाच उत्सव म्हणून पाहते आणि त्याला सर्व प्रकारची मदत करते. परंतु सरकारला हा उत्सव अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा असे वाटते. म्हणून सरकारने या उत्सवाची जागा बदलावी असा प्रस्ताव समोर ठेवला आहे.

पर्यटन विकास होऊन पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी या खाजगी कंपनीने देशाच्या अन्य भागात सुध्दा असे सनबर्न उत्सव आयोजित केलेले आहेत. त्यातला सनबर्न नोएडा हा उत्सव ६ ऑक्टोबला होईल. नोव्हेंबरच्या १५ आणि १६ तारखेला मुंबईमध्ये तर १७ आणि १८ तारखेला बंगळुरूमध्ये असेच सनबर्न उत्सव होतील.

Leave a Comment