चिरतारुण्याचे वरदान देणारा जंतू

young
लंडन – जर्मनीतल्या काही शास्त्रज्ञांनी माणसाला चिरतारुण्याचे वरदान देणारा एक सूक्ष्म जंतू शोधून काढला आहे. तो माणसाच्या शरीरात असल्यास पुनरुत्पादन करतो आणि जेव्हा त्याच्या पोटी नवे जंतू जन्माला येतात तेव्हा ते शरीराला वृध्दत्व देणार्‍या पेशींचा नाश करतात. असे शास्त्रज्ञांना आढळले आहे. या नव्या सूक्ष्म जंतूचे नाव एस. पोंबे असे असून तो माणसाची रोग प्रतिकार शक्ती वाढवू शकतो. असे प्रयोगाअंती दिसून आले आहे.

ब्रिस्टॉल विद्यापीठ आणि जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या नव्या सूक्ष्म जंतूंवर संशोधन केले जात आहे. माणसाचे शरीर वरचेवर वृध्द होत असते. परंतु वृध्द होण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्याच्या शरीरामध्ये वृध्दत्वाचा प्रतिकार करणारे घटकही तयार होत असतात. शरीराच्या चयापचय क्रियांमध्ये वृध्दत आणणार्‍या आणि वृध्दत्व टाळणार्‍या अशा दोन्ही द्रव्यांची निर्मिती होत असते. शास्त्रज्ञांनी शोधून काढलेला नवा सूक्ष्म जंतू वृध्दत्व टाळणार्‍या द्रव्यांसारखा उपयुक्त ठरतो.

या सूक्ष्म जंतू पुनरुत्पादन करतो तेव्हा तो विभाजित होतो. त्याच्या विभाजनातून निर्माण होणारा नवा घटक हा वृध्दत्वविरोधी काम करतो आणि उर्वरित घटक हे मरून जातात. आपल्या शरीरामध्ये नव्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया सतत जारी असतेच पण माणसाचे शरीर वृध्द व्हायला लागले की ही प्रक्रिया मंद होते. मात्र एस.पोंबे हा सूक्ष्म जंतू या प्रक्रियेला मंद होऊ देत नाही आणि माणूस अधिक तरुण राहतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment