
रमझानमधील इफ्तार पार्टीत सलमान आणि शाहरुखने एकमेकांना आलिंगन दिलं, तेव्हा त्यांच्यातील वाद मिटल्या आहेत, असं वाटलं होतं. मात्र बॉलिवूडचा किंग होण्याच्या बाबतीत दोघंही एकमेकांचे वैरीच आहेत, हे सलमान खानने आपल्या बोलण्यातून पुन्हा दाखवून दिलं. बिग बॉसच्या पत्रकार परिषदेत सलमान खानने शाहरुखबद्दल बोलताना म्हटलं, “मी जुने वाद विसरून त्या दिवशी शाहरुखला मिठी मारली, कारण तो रमझानचा पवित्र महिना होता. त्या दिवशी मीच नाही, तर इतरांनीही आपल्यातील वाद विसरून शत्रूशी मैत्री करावी.”
