इंडियन मुजाहेदीनला पाकचीच मदत

नवी दिल्ली – भारतात अनेक घातपाती कृत्यास कारणीभूत असलेल्या इंडियन मुजाहेदीन या अतिरेकी संघटनेला पाकिस्तानी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेची म्हणजे आयएस आयचीच आर्थिक मदत मिळते असा कबुली जबाब या संघटनेचा म्होरक्या यासीन भटकळ यांनी दिला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यात पकडण्यात आलेल्या भटकळने पोलीस तपासात पाकिस्तानच्या मदतीचे सारे तपशील सांगितले.

यापूर्वी आयएसआयने आपला इंडियन मुजाहेदीनशी कसलाही संबंध नसल्याचा खुलासा केला होता. इंडियन मुजाहेदीन ही पूर्णपणे भारतीय संघटना असून तिच्या कारवायांना भारतातूनच मदत मिळते असा दावाही केला होता. पण यासीन भटकळने आता आपण पाकिस्तानात कसे गेलो आणि तिथून आपल्याला कशी कशी मदत मिळाली हे सांगितले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खुलाशाला कसलाही अर्थ नाही.

भारत सरकार ही माहिती गोळा करून पाकिस्तानला सादर करील आणि पाकिस्तानकडून केला जाणारा आपला काही संबंध नसल्याचा कांगावा बनावट असल्याचे पाकिस्तानला दाखवून देईल असे भारताच्या गुप्तचर खात्याने दिला आहे.