रंगभूमी सेवकांच्या मदतीसाठी मोहन जोशी साकारणार ‘नाथ हा माझा’

पुणे ,: – नाट्यक्षेत्रातील सेवक संघाच्या मदतीसाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यानी ‘नाथ हा माझा’ हे नाटक सादरी करण्याची घोषणा केली आहे. त्या नाटकातील रगेल आणि रंगेल सुभानरावची प्रमुख भूमिका मोहन जोशी करणार आहेत. हे नाटक श्री सिद्घीविनायक संस्था पुन्हा रंगमंचावर आणत आहे या नाटकाचा प्रयोग येत्या 21 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता बालगंधर्व रंग मंदिर येथे होणार आहे, अशी माहिती रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या नाटकातील नटसंच नवा असणार आहे. या नाटकाच्या तिकीट विक्रीतून जमा होणारा मदतनिधी ‘रंगभूमी सेवक संघ’ या संस्थेला देण्यात येणार आहे. त्यासाठी घरोघर तिकीट विक्री सुरु आहे. अशा स्वरूपाचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे. कालेलकरांच्या या नाटकाने नाट्यरंगभूमीत खळबळ उडवून दिली होती. बंदिस्त कथा, घटनांची आकर्षक मांडणी, खुमासदार, खटकेबाज आणि भावपूर्ण संवाद अशी ताकद असलेल्या कालेलकरांच्या लेखनीतून उतरलेल्या या नाटकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता.