आरोग्यदायी जीवनाचे पंचप्राण

लंडन- ऍपल ए डे डॉक्टर अवे, या वाक्प्रचारात फार अर्थ नाही असे आता लक्षात यायला लागले आहे कारण आरोग्यासाठी असा रामबाण एकमेव उपाय उपलब्ध असू ेशकत नाही. आता आता आहार तज्ज्ञांनी उत्तम आरोग्यासाठी पाच खाद्य पेयांचा उपयोग होईल अशी ग्वाही द्यायला सुरूवात केली आहे. ते पाच प्रकार आणि त्यांचा आरोग्याला होणारा उपयोग असा आहे.

योगुर्ट – योगुर्ट मध्ये पोटॅशियम, कॅल्शीयम ही द्रव्ये. प्रथिने आणि जीवनसत्त्व ब मुबलक असते. आपण अनेकदा पोषक आहार घेतो पण त्यातली पोषण द्रव्ये शरीरात शोषून घेण्यासाठी शरीरात काही बॅक्टेरिया आवश्यक असतात. त्या जीवाणुंकडून ही द्रव्ये शोषली जातात आणि रक्तात मिसळली जातात त्यातून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. योगुर्टचे हे वैीशष्टय आहे.

ग्रीन टी – ग्रीन टी मध्ये असलेले पॉलिफेनॉल्स आणि फ्लेवेनॉइडस् आपल्या शरीराला रोग प्रतिकारक शक्ती प्रदान करीत असतात. विशेषत: अनेक प्रकारच्या संसर्गाशी मुकाबला करण्याची ताकद या द्रव्यांंमुळे मिळते. त्यातून क जीवनसत्त्वही मिळते.

बीटरूट – दररोज एक ग्लासभर बीटरूटचा रस प्राशन केला तर मेंदूला होणारा रक्त पुरवठा वाढतो आणि वार्धक्य प्रदान करणार्‍या कारणांचा निरास होतो. लीव्हरला झालेले संसर्ग आणि पचन संस्थेचे आजार या रसामुळे बरे होतात. लसूण – भारतात स्वयंपाकात सर्वाधिक वापरला जाणारा मसाल्याचा प्रकार म्हणजे लसूण. तो अँटीसेप्टीक गुर्णधर्म धारण करतो. हिरव्या भाज्या – आरोग्याच्या अनेक पैलूंना उपयुक्त ठरणारी आणि सहज उपलब्ध असणारी औषधी म्हणजे ताजी हिरवी पालेभाजी. पालेभाज्यांचे अनेक गुणधर्म आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment