मुंबई – महिंद्राच्या स्पेशल एडिशन स्कॉर्पिओ बाबत फेसबुकवरून सतत प्रचार केला जात असला तरी ही गाडी २०१० ला महिद्राने काढलेल्या स्पेशन एडिशन प्रमाणेच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. २०१० ला १००० गाड्या स्पेशल एडिशन म्हणून बाजारात आणल्या गेल्या होत्या त्याऐवजी आता ५०० गाड्याच स्पेशल एडिशन म्हणून विकल्या जाणार आहेत. कंपनीने या गाडीची किमत मात्र अजून जाहीर केलेली नाही. ही गाडी डिझेल इंजिनवर चालणारी आहे.
रेनॉल्डच्या डस्टर, फोर्डच्या इको स्पोर्ट पाठोपाठ आगामी काळात अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही बाजारात दाखल होत आहेत. त्या स्पर्धेत स्कॉर्पिओची विक्री मंदावली आहे. आत्ताच कांही उपाययोजना केली नाही तर ही विक्री आणखी घटण्याची भीती कंपनीला वाटत असून त्यावर उपाय म्हणून स्पेशल एडिशन काढली जात असल्याचेही समजते. या स्पेशल एडिशन बाबत ग्राहकांत उत्सुकता असली तरी यापेक्षा अधिक कांहीतरी कंपनीने ग्राहकांसाठी दिले पाहिजे तरच ही गाडी स्पर्धेत टिकाव धरू शकेल असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.