गोलंदाज मॅथ्यू होगार्डने घेतली निवृत्ती

लंडन – इंग्लंडचा जलदगती गोलंदाज मॅथ्यू होगार्ड याने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंडला 2005 मध्ये अ‍ॅशेज मालिकेतील विजयात होगार्डने महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसचं भारताविरुद्ध झालेल्या नेटवेस्ट मालिकेतही त्यांने आपली चुणूक दाखविली होती.

होगार्डने आपल्या ट्विटर पेजवर क्रिकेट अलविदा केल्याची घोषणा केली आहे. मॅथ्यू होगार्डचे ट्विट : मअतिशय रोमांचकारी अनुभव असणारा असा हा माझा प्रवास होता. मात्र आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. मी त्या प्रत्येकाचा ऋणी आहे, ज्यांनी मला माझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीसाठी नेहमीच मदतीचा हात दिला. असं म्हणतं त्याने आपली ही निवृत्ती जाहीर केली.

होगार्डने आपल्या कारकिर्दित 67 कसोटी सामन्यांमध्ये 248 बळी मिळविले आहेत. तर याशिवाय 26 एकदिवसीय सामने देखील खेळला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध 2000 साली लॉर्डस येथे त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर 2008 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टन येथे तो आपला शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

Leave a Comment