म्हातारपणात व्हीडीओ गेम्स वाढवितात स्मरणशक्ती

सॅन फ्रान्सिस्को – व्हीडीओ गेम्स ही तरूणांची मक्तेदारी मानली जात असली तरी ६० किंवा त्यापुढील वयाच्या वृद्ध व्यक्तींसाठी हे व्हिडीओ गेम्स स्मरणशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात असे नुकतेच संशोधनात सिद्ध झाले आहे. संशोधकांनी या संदर्भात केलेल्या प्रयोगानुसार ६० ते ८५ वयाच्या वृद्धांना कार रेसिग सारखा गेम १२ तास खेळण्यास दिला तेव्हा त्यांच्या स्मरणशकतील लक्षणीयरित्या वाढ झाल्याचे व हा परिणाम सहा महिने टिकून राहिल्याचे सिद्ध झाले.

जपानच्या वी कौन्सिलचे निर्माते निनटेंडो कंपनी आणि सॅनफ्रान्सिस्कोच्या पोझिट सायन्स कार्पो. या कंपन्यांनी हे संशोधन लक्षात घेऊन बेबी बूमर्सबरोबरच वृद्ध व्यकती हेही त्यांच्या उत्पादनाचे टार्गेट ठरविले आहे. अल्झायमर्स असोच्या वैद्यकीय व वैज्ञानिक रिलेशनच्या उपाध्यक्ष मारिया कॅरिल्लो यांनीही नुकत्याच केलेल्या लोकसंख्या सर्वेक्षणानुसार सुडोकू ज्याप्रमाणे स्मरणशक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे तसेच व्हीडीओ गेम्सही त्याच प्रमाणात उपयुक्त ठरल्याचे सांगितले.

कार रेसिगचे व्हीडीओ गेम्स तयार करताना स्पीडनुसार विविध रंगी लेन्स, वाहतूक खुणा, हिरव्या टेकड्या यामुळे मेंदूला पुरेसे खाद्य मिळतेच पण लक्ष देऊन गेम खेळणे भाग असल्याने खेळाडूचे लक्ष एकाग्र होण्यासही मदत मिळते. एकाच वेळी अनेक व्यवधानांकडे लक्ष पुरवावे लागत असल्याचे मेंदू अॅलर्ट बनतो व त्याचा फायदा स्मरण शक्ती वाढण्यास होतो असे संशोधकांचे म्हणणे आहे.

ज्या वृध्दांना कार रेसिंग व्हिडीओ गेम्सचे १२ तास प्रशिक्षण दिले गेले त्यांनी पहिल्यांदाच हा गेम खेळणार्यास २० वर्षीय तरूणांना सहज हरविले असे दिसून आले. त्यामुळे आता मोबाईलवरही या व्हिडीओ गेम्सची व्हर्जन आणली जाणार आहेत.

Leave a Comment