दगडूशेठ गणपती समोर पंधरा हजार महिलान्चे अथर्वशीर्ष

श्रीमंत दगडूशेठ गणपती या महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशात्सवातील पहिल्या गणपतीसमोर दरवर्षी ऋषीपंचमीला पहाटे पाच वाजता पुण्यातील पंधरा हजार महिला एकत्र येवून गणपती अथर्वशीर्ष म्हणतात. गेली तीस वर्षे हा उपक्रम सुरु आहे. या वर्षीच्या उपक्रमातील वैशिष्ठ्य म्हणजे महिलांमध्ये तरुण मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. त्यांचे उच्चारही स्पष्ट होते आणि त्या मुली योगाभ्यासी होत्या. पहाटेच्या वातावरणात या ऋषिकन्यांचे अथर्वशीर्ष पठण हा एक चांगला अनुभव होता.