९६ तासांत पाकिस्तानचा खात्मा करण्यास भारतीय लष्कर सज्ज

नवी दिल्ली – सीमा भागात पाकिस्तानकडून वारंवर केले जात असलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन, सीमा ओलांडून येण्याच्या आगळीकी तसेच चीनी लष्कराकडून भातीय सीमा दलांना सीमेवर गस्त घालण्यास घेतले जात असलेले आक्षेप आणि लडाख भागात वारंवार चीनी सैनिक घुसरण्याच्या घटना लक्षात घेऊन भारतीय लष्कराने युद्धाची तयारी वेगाने आणि परिणामकारक रित्या सुरू केली असल्याचे समजते. भारतीय सेनेने तिबेट भागात चीन सीमेवर ३५ चौक्या उभारणीचे काम हाती घेतल्याने चीनने चिता व्यक्त केली आहे व दोन्ही देशातील तणाव वाढेल असा इशारा दिला आहे. कोणत्याही क्षणी दोन्ही मोर्चांवर युद्ध करावे लागेल हे लक्षात घेऊनच भारतीय लष्कर त्यासाठी सज्ज होत आहे.

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्रालयाने ९० दिवस चालू शकणार्‍या युद्धाच्या तयारीला लागा असा आदेश लष्कराला दिला आहे. जर पाक आणि चीन दोघांशीही एकाचवेळी युद्ध करावे लागले तर पाकिस्तानला ९६ तासात हरवायचे आणि चीनला भारतात घुसण्यापासून रोखायचे ही रणनीती आखली गेली असून भारतीय सेना त्यादृष्टीने तयारीला लागली आहे.

पाकिस्तानी डेली टाईम्सने भारताने युद्ध झालेच तर पहिल्या ९६ तासातच पाकवर निर्णायक विजय मिळविण्याची तयारी चालविली असल्याचे वृत्त दिले आहे. एकाचवेळी दोन आघाड्यांवर लढण्यचा अनुभव भारताकडे आहे असेही यात म्हटले गेले आहे. संरक्षण मंत्रालयातील अधिकार्यांरकडून मिळालेल्या माहितीनुसार अंदमान निकोबार नेव्हल बेसमुळे भारताची ताकद वाढली आहे. तिबेटजवळ भारतीय सेनेने सध्याच्या ११ लाख पर्वतीय डिव्ंहीजन सैन्याशिवाय आणखी ५० हजार सैनिक तैनात केले आहेत. हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स, गनशिप,होवित्झर तोफाही सैन्याच्या दिमतीस सज्ज केल्या गेल्या आहेत. शिवाय या भागात मानवरहित टेहळणी विमाने तसेच टी ९० टँकही तैनात केले गेले असल्याचे समजते.