सॅमसंगचा मॉडर्न फ्रिज व १० इंची टॅब्लेट भारतीय बाजारात

बर्लीन – सॅमसंगने ग्राहकोपयोगी इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचा खप वाढविण्यासाठी भारतीय बाजारावर आपली नजर ठेवली असून येत्या तीन महिन्यांत त्यांची किमान अर्धा डझन उत्पादने भारतीय बाजारात दाखल होत आहेत.

भारतीय बाजारात मोठ्या स्क्रीनचे टिव्ही, प्रशस्त फ्रिज आणि टॅब्लेटची मागणी वाढत आहे. हे लक्षात घेऊन आणि भारतात आगामी काळात सणासमारंभांची असलेली धामधूम लक्षात घेऊन सॅमसंग २०१३ च्या अखेरी साईड बाय साईड फ्रिज बाजारात आणत आहेत. हे फ्रिज विजेची ४० टक्के बचत करणारे आहेत शिवाय त्यांच्यावर १० वर्षांची वॉरंटी आहे. अल्ट्रा हाय डेफिनेशन टिव्हीही बाजारात आणले जात आहेत.

भारतीय बाजारात ४० इंची स्क्रीनपेक्षा मोठ्या स्क्रीनच्या टिव्हींना चांगली मागणी आहे यानुसार बाजारात आणले जात असलेले अल्ट्रा हाय डेफिनेशन टिव्ही नवीन तंत्रज्ञानाने युक्त आहेत असे कंपनीचे वरीष्ठ उपाध्यक्ष अतुल जैन यांचे म्हणणे आहे. या टिव्हीत ग्राहक इव्होल्युशन कीटचा वापर करू शकणार आहे ज्यामुळे कंपनीची नवीन येणार्याज अॅपचाही वापर याच टिव्हीवर करता येणार आहे. नोट तीन व गॅलॅक्सी गिअर २५ सप्टेंबरला बाजारात येत असून त्या पाठोपाठ नोट १०.१ हा बाजारात आणला जात आहे. दिवाळीच्या तोंडावर हा टॅब्लेट भारतीय बाजारात दाखल होईल असे जैन यांचे म्हणणे आहे.