अबब ! सात हजार किलोचा लाडू ?

राजमुंद्री – गणपती बाप्पाचे आगमन झाले की प्रसादाचीही धूम उडत असते. गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी जगातील सर्वात वजनदार लाडू बनविण्याचे रेकॉर्ड नोंदविले गेले असून हा लाडू तब्बल ७ हजार किलोंचा आहे.

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजमुंद्रीच्या पुष्कर घाटावर असलेल्या राजमुंद्री गणेश उत्सव समितीसाठी हा लाडू तपेश्वरम येतील श्री भक्त अंजनेय स्वीटसचे मालक एस. वेंकटेश्वर राव यांनी बनविला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही वेंकटेश राव यांनी असाच भलामोठा लाडू बनवून दोन वेळा गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डस मध्ये नांव नोंदविले आहे. यंदाच्या वर्षी ते तिसर्‍यांदा रेकॉर्डसाठी प्रयत्नशील आहेत. हा महाप्रसाद सोमवारी सकाळी गणेश उत्सव समितीकडे सोपविला गेला असल्याचे समजते.