गुप्त शस्त्रांसह उतरणार चीनेच चांद्रयान

बिजिंग – या वर्षअखेर चंद्रावर उतरणारे चीनचे चेंज ३ हे चांद्रयान गुप्त शस्त्रांसह चंद्रावर उतरणार असल्याचे या मोहिमेतील प्रमुख वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्सने हे वृत्त दिले आहे.

चांद्र मोहिमेशी संबंधित वरीष्ठ सल्लागार ओयांग शियआन यांच्याकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार चेंज ३ या चीनी अंतराळयानात अनेक कॅमेरे बसविले गेले आहेत त्याचबरोबर विशेष खगोलिय दुर्बिणही बसविली गेली आहे. ही दुर्बिण चंद्रावरून दिसणारे तारे, आकाशगंगा आणि ब्रह्मांडाची चित्रे पाठविणार आहे. चंद्रावर वातावरण तसेच चुंबकीय क्षेत्र नसल्याने ही छायाचित्रे अतिशय स्पष्ट असतील असेही सांगितले जात आहे. या छायाचित्रांमधून महत्त्वाचे नवे कांहीतरी हाती येईल असा चिनी संशोधकांचा विश्वास आहे.

या यानात एक विशेष कॅमेरा बसविला गेला असून हा कॅमेरा पृथ्वीवरील वातावरण तसेच पर्यावरण बदल यांची निरीक्षणे करणार आहे. या यानात एका रडारचाही समावेश आहे. चीनचा चंद्रावर यान उतरविण्याचा हा दुसरा प्रयत्न आहे.