संदेश दळणवळण गुप्त व सुरक्षित ठेवणारे तंत्रज्ञान विकसित

लंडन – ब्रिटीश संशोधकांनी संवेदनशील व अति महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण इंटरनेटच्या माध्यमातून करताना ही माहिती फोडता येऊ नये यासाठी नवे तंत्रज्ञान शोधून काढले आहे. क्वंटम क्रिप्टोग्राफी च्या सहाय्याने फायबर लिंकमधून ही माहिती फोटॉन लाईटच्या सहाय्याने वाहून नेली जाते व ती चोरी करणे जवळपास अशक्य असते असा संशोधकांचा दावा आहे.

तोशिबाच्या केंब्रिज रिसर्च लॅबोरेटरीचे संशोधक अँड्रूयू शिल्ड व त्यांच्या सहकार्‍यांनी हे तंत्रज्ञान शोधले आहे. त्यांच्या मते गुप्त अथवा संवेदनशील माहिती एकदा फोटॉन मध्ये गेली की हा फोटॉन बदलतो. त्यात कुणालाच इंटरसेट करणे शक्य होत नाही. एकाच वेळी ६४ युजर सर्व ट्रान्समिशन एकाच सिंगल फायबर लिंक मधून करू शकतात. याचे प्रात्यक्षिकही सादर केले गेले आहे. पुढच्या दशकापर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी स्मार्टफोनमध्येही हे तंत्रज्ञान उपलब्ध होईल असा या संशोधकांचा दावा आहे.

Leave a Comment