
जोधपूर – अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी सध्या अटक झालेले आध्यात्मिक संत आसाराम बापू यांच्याबद्दल नवीन खुलासा झाला आहे. आसाराम बापू आपल्या महिला भक्तांची अश्लील सीडी बनवून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आसाराम बापू यांच्या गुप्त सीडीबद्दल त्यांच्याच आश्रमातील शिवाने माहिती दिली आहे. पोलिसांच्या ताब्यात असणार्या शिवाने आश्रमामधील अनेक अश्लाघ्य घटनांबद्दल माहिती दिली आहे. सीडी मिळेपर्यंत शिवा पोलिसांच्या ताब्यात असेल.
