गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनुष्का शर्माने सर्जरी केलेल्या ओठावर चर्चा रंगली आहे. ‘जब तक है जान’ या सिनेमाच्या यशानंतर तिने ओठावर सर्जरी करून ओठ मोठे करून घेतल्याने ते पूर्वीच्याच तुलनेत आकर्षक दिसत आहेत. आगामी काळात येत असलेल्याघ अनुराग बसूच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमात ती डबल रोल करणार असल्याची चर्चा आहे.
‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमाची अधिकृत घोषणा झाल्यापासून या सिनेमाबाबत चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. या सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्मा दुहेरी भूमिका करणार असल्याची चर्चा आहे. अनुष्का ‘बॉम्बे वेल्वेट’मध्ये जॅझ गायकाची भूमिका साकारणार असून रणबीर कपूर यात स्ट्रीट फायटरची भूमिका करणार आहे. ‘रबने बना दी जोडी’, ‘बँड बाजा बारात’, ‘जब तक है जान’ आणि ‘पी.के’ यांसारख्या चित्रपटात काम करणारी अनुष्का पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्या मुळे आगामी काळात येत असलेल्याप या सिनेमाबाबत तिला मोठी उत्सुकता लागली आहे.
जुलैच्या तिस-या आठवड्यात श्रीलंकेत बॉम्बे वेल्वेट या सिनेमाच्या पहिल्या भागाचे शुट सुरू होणार आहे. तर दुस-यया भागाचे शुट नोव्हेंबर महिन्यात कोलकत्यात सुरू करण्यात येणार आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची निर्मिती फॅन्टॉम फिल्म्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओ करत आहे.