
पुणे – गणरायाचे आगमन आता अगदी तोंडावर आले आहे. घरोघरी गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. यंदा पुणेकरांनी मात्र दुकानातून गणपती बाप्पांची मूर्ती आणण्याऐवजी घरीच बनविलेल्या मूर्तीची स्थापना करण्यास पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे.
पुणे – गणरायाचे आगमन आता अगदी तोंडावर आले आहे. घरोघरी गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू आहे. यंदा पुणेकरांनी मात्र दुकानातून गणपती बाप्पांची मूर्ती आणण्याऐवजी घरीच बनविलेल्या मूर्तीची स्थापना करण्यास पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे.
गेली कांही वर्षे पुण्यात गणेशोत्सवाच्या अगोदर मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. या कार्यशाळांना यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेक पुणेकरांनी स्वतःच्या हातानेच मातीची मूर्ती बनविण्याचा आनंद घेतला असून गतवर्षीपेक्षा ही संख्या यंदा २० टक्कयांनी वाढली आहे. या मूर्ती पर्यावरणपूरक आहेतच पण कमी किमतीत बनतात, विसर्जन घरातच करता येते व मूर्ती बनविण्याचा व आपणच बनविलेली मूर्ती पुजण्याचा आनंदंही मिळतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.
गणपती मूर्तीचा बेसिक आकार मनात असेल तर कुणीही गणपतीची मूर्ती थोड्याशा प्रशिक्षणानंतर बनवू शकतो असे गेली चार वर्षे अशा कार्यशाळा घेणारे कलाकार मंदार मराठे सांगतात. ही सर्व प्रक्रिया सोपी असतेच पण सर्व कुटुंबच त्यात सहभागी होत असल्याने सणाचा आनंद अधिक मिळतो असे सांगून ते म्हणाले की अगदी दुसर्यासारखा गणपती बनला नाही तरी आपला गणपती युनिक ठरतोच. यंदा या कार्यशाळेत ८ ते ८० वयोगटातील नागरिक सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
गेली कांही वर्षे कार्यशाळेचा वाढता प्रतिसाद पाहून मराठे यांनी यंदा ऑनलाइन व्हिडीओ ट्यूटोरियलही सुरू केली आहेत. अमेरिकेतील भारतीयांसह बंगलोर, दिल्लीतील नागरिकांनीही त्याचा लाभ घेतला असल्याचे ते सांगतात. यामिनी राठी तसेच दिलिप व दर्शन ठकार यांनीही गणपती मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. राठी यांच्या म्हणण्यानुसार घरीच मूर्ती बनविण्यास पसंती देणार्याा नागरिकांची संख्या वाढती असून ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. अवघ्या दोन तासात मूर्ती तयार होते आणि आपल्या हाताने बनलेली मूर्ती पुजण्याचे आगळेच समाधान मिळते अशी नागरिकांची भावना आहे.
———