राजकुमार संतोषींच्या ‘अंदाज अपना अपना’ या सिनेमाचा आगामी काळात रिमेक तयार केला जात असून यामध्येय रणबीर, शाहिद एकत्र झळकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर कपूर आणि शाहिद कपूर हे दोघेजण ‘अंदाज अपना अपना’च्या रिमेकमध्ये अमर आणि प्रेमची भूमिका साकारण्याची शक्यता आहे.
राजकुमार संतोषी यांनी शाहिद आणि रणबीरसोबत ‘फटा पोस्टर निकला हिरो’ आणि ‘अजब प्रेम की गजब’ कहानी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी शाहिदला ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटासाठी विचारले असून तो या कल्पनेने खूश आहे. तसेच, राजकुमार संतोषीदेखील या दोघांसमवेत काम करण्यास उत्सुक आहेत.
यापूर्वी ‘अंदाज अपना अपना’ या सिनेमात एकत्र काम करणा-या आमिर-सलमान या दोन खानांनी त्यांच्या अभिनयाने आणि हास्यविनोदांनी प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली होती. आता, या सिनेमात दोन बॉलीवूड खान सुपसरस्टार्सनी साकारलेली भूमिका दोन कपूर करणार आहेत. संतोषी यांनी रिमेकसाठी आमिर आणि सलमानला पुन्हा सिनेमात घेण्याचा विचार केला होता. पण, या दोन्ही कलाकारांच्या तारखा मिळत नसल्यामुळे त्यांना रणबीर-शाहिदकडे वळावे लागले.