’आखिर बहू भी तो बेटी ही है’

एकत्र कुटुंब विभक्त होण्यासाठी सासु-सुनांमधील वाद कारणीभूत ठरतात ही मध्यवर्ती कल्पना असलेली ’आखिर बहू भी तो बेटी ही है’ ही नवीन मालिका 16 सप्टेंबरपासून रात्री 9 वाजता सहारा वन वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या रुढीवादी कुटुंबातील ही कहाणी. अत्यंत कडक स्वभाव, हुकमत गाजविण्याची वृत्ती, कर्मकांडांवर विश्वास असणारी नौलखा देवी (प्राची पाठक) सासूच्या भुमिकेत आहे. उत्साही, बुध्दिमान, आत्मविश्वास आणि खोडकर स्वभावाची सिया (पायल राजपूत) सुनेची भूमिका करीत आहे. जर मुलगी आपले कुटुंब सोडून पतीच्या कुटुंबाला आपले कुटुंब म्हणून स्वीकारते आणि आपली सर्व कर्तव्ये पार पाडते, मग तिच्या सासु-सासर्‍यांनी तिला मुलीप्रमाणे का वागवू नये? या विषयावर खुलेपणाने चर्चा करण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे करण्यात आला आहे.