नवी दिल्ली – किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा अवयव आहे. कारण तो रक्ताच्या बाबतीत फिल्टरसारखे काम करीत असतो. शरीरातले नको असलेले घटक गाळून बाजूला करणे आणि ते लघवी वाटे बाहेर टाकणे हे या अवयवाचे काम आहे. त्याच्यामुळेच शरीरातला रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो. म्हणून किडनीचे रक्षण करणे तसेच तिला तंदुरुस्त ठेवणे गरजेचे आहे.
किडनीचे संरक्षण कसे करावे ?
कीडनी निकामी झाली की शरीरातले त्याज्य अशुद्ध घटक वेगळे करू शकत नाही आणि या अशुद्धीचे दुष्परिणाम शरीरातल्या सर्वच अवयवांवर होतात. किडनीचा सर्वात मोठा विकार म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज. तो पाच प्रकारचा असतो. त्यात किडनीचे काम पूर्ण बंद होते. या विकारातूनच पुढे मधुमेह, हृदयविकार असे रोग जडतात. जाडी वाढणे, रोगप्रतिकारक शक्ती संपणे असे प्रकारही त्यातूनच उद्भवतात.
दहा लाख लोकसंख्येमागे १०० जणांना किडनीचे कसले ना कसले विकार होतच असतात. त्यावर किडनी रोपन करणे हा इलाज आहे पण त्यासाठी भारतात दरसाल किमान ९० हजार दाते तयार होणे गरजेचे आहे. आपल्याला किडनीच्या विकारापासून दूर ठेवण्यासाठी खालील पत्थे पाळणे गरजेचे आहे. १. आहारात फळांंचा वापर करा. २. धूम्रपान करू नका. ३. दारू पिण्यावर नियंत्रण ठेवा. ४. दररोच व्यायाम करा.५. वजन वाढू देऊ नका. ६. मीठ खाणे कमी करा. ७. रक्तदाब आणि चरबी यांच्यावर लक्ष ठेवा. ८. वेदनाशामक गोळ्याचा अतिवापर टाळा. ९. भरपूर पाणी आणि पेये प्या. १०.
