एसटी बस आता फेसबुकवर

stbus
पुणे – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) अधुनिकिकरणाचा रस्ता पकडला आहे. नेटकरांना आपलेल्से करण्यासाठी एसटी सोशल नेटवर्किंगमध्ये उतरली असून फेसबुकवर एसटीचे पेज तयार करण्यात आले आहे. फेसबुकवर येणारे देशातील हे दुसरे परिवहन महामंडळ ठरले आहे.

सोशल नेटवर्किंग साईटसचा वापर सध्या वाढता आहे. युवा पिढीसह आबालवृद्ध त्याचा वापर करीत आहेत. हे लक्षात घेऊन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांच्या कल्पनेतून हे पेज साकारले आहे. यावर प्रवाशांनी केलेल्या सूचनांना तत्काळ प्रतिसाद देण्याची सुविधा आहे. त्याशिवाय प्रवाशांना काही माहिती हवी असल्यास ती उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या पूर्वी देशात कर्नाटक परिवहन महामंडळाने फेसबुकवर पेज तयार केलेले आहे, एसटीचे प्रत्येक जिल्ह्यात आरक्षण करणारे एजंट कोण आहेत, त्यांची माहिती तसेच दूरध्वनी क‘मांक, महत्त्वाच्या मार्गांवरील बसगाड्यांचे वेळापत्रक, तसेच प्रवासी पास माहिती व दर आकारणी आदींचा तपशील त्यात असेल. प्रवाशांना अन्य काही माहिती हवी असल्यास ती देण्यासाठीही यंत्रणा उभारण्यात आली आहे. फेबसबुकवरील हे पेज सातत्याने अपडेट’ होणार आहे.

Leave a Comment