मायक्रोसॉफ्टकडून नोकिया हँडसेट व्यवसायाची खरेदी

एकेकाळी मोबाईल हँडसेट बाजारात अव्वल कंपनी असलेल्या नोकियाची खरेदी मायक्रोसॉफटकडून ७.२ अब्ज डॉलर्स मध्ये केली जात असल्याचे वृत्त आहे. अॅपल आणि सॅमसंग या स्मार्टफोन क्षेत्रातील कंपन्यांनी उभ्या केलेल्या तगड्या स्पर्धेला तोंड देण्यात नोकिया कमी पडत असून ही आव्हाने पेलणे कंपनीला जड जात असल्याचे सांगितले जात आहे. मायक्रोसॉफट कडून केला जात असलेला खरेदीचा व्यवहार २०१४ च्या पहिल्या तिमाहीत पूर्ण केला जाणार असल्याचेही समजते.

हा खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फिनलंड नोकिया चा सीइओ स्टीफन इलोप मायक्रोसॉफट कंपनीत जॉईन होणार असल्याचेही सांगितले गेले आहे. नोकिया या व्यवहारासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची सध्या पूर्तता करत आहे. मायक्रोसॉफट विंडोज सॉफटवेअरवर नोकियाचे हँडसेट यापुढे चालतील असेही सांगितले जात आहे.

मायक्रोसॉफटचे सध्याचे सीईओ स्टीव्ह बालमेर म्हणाले की या व्यवहारातून दोन्ही कंपन्यांचे भागभांडवलदार, ग्राहक आणि कर्मचार्यां ना चांगला फायदा होऊ शकणार आहे. दोन ग्रेट कंपन्या एकत्र येत असल्याने कंपनीचा बाजारातील हिस्सा आणि नफाही लक्षणीयरित्या वाढेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment