महिलांपासून संतांनी दूर राहणे आवश्यकच-रामदेवबाबा

हरद्वार – योगगुरू रामदेवबाबा यांनी संत आणि धर्मगुरूंनी महिलांपासून अंतर राखणे आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की संत आणि धर्मगुरूंसाठी धर्मग्रंथात हे नमूद केले गेले आहे की केवळ परक्या महिलाच नव्हे तर कौटुंबिक नात्यातील आई, बहिण, मुलगी, सासू अशा नात्यांतील महिला सदस्यांपासूनही संतांनी अंतर राखणे योग्य आहे. संतांची समाजातील वर्तणूक कशी असावी याचे स्पष्ट नियम धर्मग्रंथात दिले गेले आहेत आणि ते मोडले गेले तर संत अथवा धर्मगुरू कधी ना कधी संकटात सापडणार हे निश्चित आहे.

आसारामबापू यांच्यावर लैगिक शोषणाचे आरोप झाल्याप्रकरणात त्यांचे नांव न घेता रामदेवबाबांनी हे मत व्यक्त केले आहे. धर्मग्रंथात संतांच्या वर्तणुकीसाठी दिलेले सिद्धांत जर पाळले गेले नाहीत तर अशा संकटांचा सामना करायची वेळ कधी ना कधी येणारच असेही ते म्हणाले.