करिश्माच्या नव्या मित्राबाबत उत्सुकता

संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा घटस्फोटानंतर करिश्माच्या आयुष्यात एका नव्या मित्राची एन्ट्री झाली आहे. तिचा हा नवा मित्र कोण याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पती संजय कपूरशी संबंध तोडल्यानंतर करिश्मा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतच आपल्या आईच्या घरी राहत आहे.

सध्या करिश्माचे आयुष्य नवीन नवीन गोष्टींचा आनंद घेण्यात सुरू आहे. मुलांसाठीही ती तितकाच वेळ देते. परंतु, सोबतच करिश्मा आपल्या एका खास मित्रासोबत बराच वेळ व्यतीत करत आहे. करिश्माचा हा नवीन मित्र एका कंपनीचा सीईओ आहे. पती संजय कपूरशी संबंध तोडल्यानंतर करिश्मा गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतच आपल्या आईच्या घरी राहत आहे. दोन मुलांनंतरही करिश्मा आणि संजयचे संबंध काही सुधारण्याचे चिन्ह नव्हते. त्याहमुळे करिश्मा अनेक दिवस चिंताग्रस्त होती. त्यानंतर तिने संजयपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

करिश्माच्या आयुष्यात आता एक असा व्यक्ती आला आहे ज्याच्यासोबत ती खूप खूश आहे. अनेकदा या दोघांना फिरताना पाहिले आहे. हॉटेल्स, रेस्टोरंटस् आणि अनेक पार्ट्यांमध्येही हे दोघे जण अनेकदा एकत्रच दिसतात अशी माहिती सूत्रांने ‍दिली.

Leave a Comment