डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्या- मुंडे

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. चांगल्या आयपीएस अधिका-यांना पुण्यात पोस्टिंग दिले जात नाही, असा आरोप भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी करत डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला दोन आठवडे पूर्ण झालेत. मात्र आरोपींना अटक करने तर दूरच, या प्रकरणाचे सबळ धागेदोरेही पोलिसांना मिळालेले नाहीत. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची उकल होणे अशक्य आहे, अशी टीकाही गोपीनाथ मुंडे यांनी केली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी ही मुंडे यांनी केली आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणातल्या दुस-या संशयिताचे स्केच पुणे पोलिसांनी जारी केले आहे.
दोन हल्लेखोरांपैकी एका संशयिताचे स्केच याआधीच पोलिसांनी जारी केले आहे. त्यानंतर आणखी काही प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी करण्यात आली. त्यापैकी एकाने सांगितलेल्या वर्णनावरून दुस-या आरोपीचे स्केच तयार करण्यात आले आहे. दाभोलकरांच्या हत्येच्या तपासामध्ये प्रयत्न सुरु आहेत, एवढंच उत्तर पोलिसांकडून मिळत आहे.

Leave a Comment