इस्लामाबाद – पाकिस्तानच्या न्यायालयीन आयोगाचे आठ सदस्यीय शिष्टमंडळ 7 सप्टेंबरपासून भारतात येत आहे. 26-11 मुंबई हल्ल्यातील सात संशयितांवरील खटला पुढे चालवण्यासाठी ते हल्ल्यातील चार साक्षीदारांची उलटतपासणी करणार आहेत. पाकिस्तानचे पथक 5 ते 6 सप्टेंबरदरम्यान मुंबईचा दौरा करू शकते, असे भारताकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले होते.
पाकिस्तानी आयोग मुंबई भेटीवर
या दरम्यान पाकिस्तानाहून भारतासाठी विमानसेवा नसल्याने पथक सात सप्टेंबर रोजी रवाना होणार असल्याचे संशयितांच्या वकिलांपैकी एक रियाझ अक्रम चिमा यांनी सांगितले आहे. तसेच पथकाला उटलतपासणीसाठी किमान चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याचेही त्यांनी कळवले आहे. मुंबईचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी पी.वाय. लाडेकर पाकिस्तानच्या पथकाला सहकार्य करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
