नितांतसुंदर सुवर्ण मंदिर

अमृतसर – आपण लहानपणी अमृतसरचे सुवर्ण मंदिर फोटोत पाहिले असेल परंतु प्रत्यक्षात ते आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपला आपल्या डोळ्यावर विश्‍वास बसत नाही. इतके ते फोटोतल्यापेक्षा सुंदर आहे. विशेषतः या सुवर्ण मंदिरावर सूर्याची कोवळी किरणे पडतात तेव्हा त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. एखाद्या भल्या सकाळी आपण सुवर्ण मंदिर पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यावर विश्‍वास बसत नाही. इतके सुंदर मंदिर या पृथ्वीतलावर असेल याची आपण कल्पनाही केलेली नसते. आपण सत्य पाहत आहोत की स्वप्न आहे याचा क्षणभर विसर पडतो.

golden-temple

१५८९ साली लाहोरमधील एका मुस्लीम संताने या सुवर्ण मंदिराचा पाया घातला. या मुस्लीम संताचे नाव मिया मीर असे होते. नंतर ते १६०१ साली पूर्ण झाले. दिल्लीपासून ४५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराची उभारणी गुरु रामदास यांनी पूर्ण केली. या मंदिराच्या भोवती सरोवर खोदलेले आहे आणि या प्रचंड मोठ्या सरोवराच्या निळ्याशार पाण्यामध्ये सुवर्ण मंदिराचे प्रतिबिंब पडते. तेव्हा ते पाणीही प्रेक्षणीय होऊन जाते.

golden-temple1

सुवर्ण मंदिराला शीख पंथामध्ये हरमंदिर साहिब असेही म्हटले जाते. या मंदिराला जाण्यास चार दरवाजे आहेत आणि त्यातल्या कोणत्याही दरवाजाने गेल्यास शीख पंथाचा सर्वात पवित्र ग्रंथ म्हणविल्या जाणार्‍या गुरु ग्रंथ साहिबाचे दालन लागते. या सरोवराच्या दोन बाजूला दोन प्रचंड मोठे टॉवर्स आहेत आणि त्यावर अजस्त्र घड्याळे बसविली आहेत. त्यातल्या एका टॉवरमध्ये भंडारा आहे. ज्यामध्ये तिथे आलेल्या प्रत्येक भाविकाच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. या भंडार्‍याला पंजाबी मध्ये लंगर म्हणतात.

golden-temple2

दुसर्‍या टॉवरमध्ये एक वस्तू संग्रहालय असून त्यामध्ये शीख पंथाचा इतिहास दर्शविणार्‍या वस्तू आणि ग्रंथ ठेवले आहेत. अमृतसरला शीख पंथाचे उपासक मोठ्या संख्येने येतात.

Leave a Comment