काका-पुतण्यामध्ये कोण बाजी मारणार

मुंबई- धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी सोमवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि भाजप-शिवसेना पुरस्कृत पृथ्वीराज काकडे यांच्यात लढत होत आहे.

या निवडणुकीतून धनंजय मुंडे यांनी काका आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडेंना आव्हान दिले आहे. या निवडणुकीत केवळ विधानसभेचे आमदार मतदान करणार असल्याने धनंजय मुंडे यांचा विजय निश्चित मानला जातोय. मात्र, सहजासहजी धनंजय मुंडेंना विजय मिळवू न देण्याचे गोपीनाथ मुंडे यांनी ठरवले आहे. गोपीनाथ मुंडे जातीने या निवडणुकीत लक्ष घालताना दिसले. त्यामुळे मुंडे विरुद्ध मुंडे हा संघर्ष या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक मुंबईत पार पडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणुकीत धनंजय मुंडे बाजी मारतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment