पाटणा – दिल्लीत गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकारातला अल्पवयीन आरोपी या प्रकरणात दोषी ठरला असून त्याला तीन वर्षे रिमांड होममध्ये ठेवण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याच्यावर बाल न्यायालयात खटला चालवण्यात आला होता आणि त्यात तो दोषी ठरला आहे. या बलात्कार प्रकरणातला तो सहा पैकी एक आरोपी होता. त्यातल्या एका आरोपीने तुरुंगातच आत्महत्या केलेली आहे. आता अन्य चार आरोपींना काय शिक्षा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्ली बलात्कार : अल्पवयीन आरोपीला ३ वर्षे रिमांडची शिक्षा
काल बाल न्यायालयात हा निकाल जाहीर झाला तेव्हा पत्रकारांना आत सोडण्यात आले नव्हते. बलात्कारित मुलीच्या आईला मात्र आत प्रवेश होता. तिने ही शिक्षा ऐकली आणि बाहेर येऊन पत्रकारांना सांगितली. आपण या निर्णयाने नाराज आहोत आणि या निकाला आव्हात देण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत असे तिने सांगितले.
या अल्पवयीन आरोपीच्या विरोधात देशातल्या जनतेत फार नाराजी होती कारण तो या बलात्काराच्या प्रकरणात सर्वात आक्रमकपणे वागत होता. तो अल्पवयीन असला तरीही त्याच्यावर अन्य आरोपींप्रमाणेच खटला चालावा अशी मागणी देेशभरातून करण्यात आली होती. त्यामुळे सर्वोच्य न्यायालयाने त्याच्या संबंधाने निकाल जाहीर करण्यास बाल न्यायालयाला बंदी केली होती. मात्र २२ तारखेला सर्वोच्य न्यायालयाने ही बंदी मागे घेतली. त्यामुळे हा निकाल जाहीर झाला.
