अभिनेता ओम पुरी यांना अटक

मुंबई – अभिनेता ओम पुरी यांनी शनिवारी रात्री वर्सोवा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केल्यानंतर पत्नीवरील हल्ला प्रकरनात अटक करण्यात आली. मात्र लगेचच जामीनावर त्यांची सुटकाही झाली. वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक हरिश्चंद्र परमाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ओम पुरी यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर १० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीनावर सुटका करण्यात आली.’

अभिनेते ओम पुरी यांची पत्नी नंदिता हिने २२ ऑगस्टला ओम पुरी यांनी काठीने मारहाण केल्याची तक्रार नोंदविली होती. ६२ वर्षीय ओम पुरीवर वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या ३२४, ५०४ आणि ५०६ कलमातर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ओम पुरी परदेशात जाणार होते. त्यामुळे त्यांनी शनिवारी रात्री वर्सोवा पोलीस ठाण्यातआत्मसमर्पण केले असल्याचे समजते. आपल्या वर्सोवातल्या फ्लॅटवरुन ओम पुरी आणि त्यांची पत्नी नंदिता यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर मारपीट झाल्याची तक्रार नंदिता यांनी पोलीस स्टेशनमध्ये केली होती.

Leave a Comment