सचिनने केली प्रॅक्टिसला सुरूवात

मुंबई- काही दिवसांपूर्वी झालेल्या हातावरील शस्त्रक्रियेनंतर विक्रमवीर सचिन तेंडुलकरने आगामी चॅँपियन्स लीग टी-२० च्या सरावाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएलमधून सचिन निवृत्त झाला असला तरी चॅँपियन्स लीगमध्ये तो मुंबई इंडियन्सचे शेवटचे प्रतिनिधित्व करणार आहे. गेल्या महिन्यातच लंडनमध्ये सचिनच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे.

यावेळी सरावानंतर पत्रकारांशी बोलताना सचिन म्हाणाला, ‘यावर्षी मे मध्ये आयपीएलदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे माझ्या हातावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र आता मी नेट्समध्ये गेल्या काही दिवसांपासून फलंदाजीचा सराव करत आहे. त्याचमुळे आगामी काळात होत असलेल्या चॅँपियन्स लीगसाठी मी सज्ज झालो आहे.’

आगामी काळात होत असलेल्या चँपियन्स लीग टी-२० स्पर्धेतून मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला वगळले आहे. तसेच श्रीलंकेच्या कंडुरता मरून्स संघाने सिनियर क्रिकेटपटू कुमार संगकाराला संघात स्थान दिले नाही.