
जकार्ता – इंडोनेशियाच्या सागर किनार्यावर वाळवंटात चालणारा आगळा वेगळा शार्क मासा सापडला आहे. या शार्क माशाला त्या भागात व्हाईट बांबू शार्क असे म्हटले जाते. तो रात्री वाळवंटात आपल्या कल्ल्यांच्या आधारावर चालू शकतो अशी माहिती कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल या संस्थेने दिली आहे. या संस्थेचे शास्त्रज्ञ गेल्या काही दिवसांपासून या माशाचा शोध लावण्यासाठी धडपडत होते.