
बॉक्सऑफिस वर सुपरडूपर हिट ठरलेल्या ”दिल” चा लवकरच सिक्वेल येत आहे. या चित्रपटात धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने एका आयटम नंबरवर थिरकणार असल्याची चर्चा आहे. माधुरीच्या डान्सचे दिवाने असलेल्या चाहत्यांना लवकरच परत तिचे ठुमके पाहायला मिळणार आहेत. १९९० च्या दशकात आलेल्या ”दिल” या चित्रपटाने आणि यातील गाण्यांनी धूम माजवली होती. प्रेमकथेवर आधारीत असलेल्या या चित्रपटात अमीर खान आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. डायरेक्टर इंद्र कुमारचा हा पहिलाच चित्रपट होता. आणि तो सुपरहिट ठरला.
