ओम पुरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

मुंबई : उच्च न्यायालयाने मिस वर्ल्ड युक्ता मुखी हिचा पती प्रिन्स तुली याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तात्काळ सुनावणीचे आदेश दिल्याने सत्र न्यायालयाने ओम पुरी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी व्हायची सुनावणी शनिवारपर्यंत तहकूब केली. मात्र, तेव्हा पुरी यांच्या अर्जावर शनिवार सुनावणी होणार आहे.

अभिनेता ओम पुरी यांनी पत्नीला मारहाण केल्याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर शुक्रवारी सत्र न्यायाधीश डी. ए. ढोलकीया यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात पुरी यांच्यावतीने युक्तीवाद सुरू होताच न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रिन्स तुली यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

तेव्हा पुरी यांच्या अर्जावर शनिवार सुनावणी होईल. त्यावर ही येत्या सोमवारी घ्यावी, अशी विनंती पुरी यांची पत्नी नंदिता यांचे वकील सतिश मानेशिंदे यांनी केली. मात्र त्यास अँड. नितिन प्रधान यांनी विरोध करत या अर्जावर सुनावणी शनिवारी सकाळी घेण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली.

Leave a Comment