आसाराम बापू समर्थकांचा मिडीया कर्मचा-यांवर हल्ला

इंदूर : आसाराम बापू समर्थकांनी इंदूरमध्ये आश्रमात मीडिया कर्मचा-यावर हल्ला केला. लैंगिक शोषणाच्या आरोपावरून आसाराम बापू यांना शनिवारी अटकेची शक्यता असल्याने मीडियाचे प्रतिनिधी आज इंदूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी आसाराम बापू समर्थकांनी मीडियाशी हुज्जत तसेच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आहे.

आसाराम बापू समर्थकांनी मीडियाला थोपवण्यासाठी महिलांना पुढे केले आहे. यावेळी महिला समर्थकांनी इंदूरमध्ये आश्रमात मीडिया कर्मचा-यावर हल्ला केला. लैंगिक शोषणाच्या आरोपावरून आसाराम बापू यांना शनिवारी अटकेची शक्यता आहे.

जोधपूर पोलिसांनी आसाराम बापू यांना अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शुक्रवारपर्यंत पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स जारी केले होते. मात्र बापूंनी आजारी असल्याचे कारण देत हजर राहण्यास नकार दिला. त्यामुळे राजस्थान पोलिसांचे बापूंना आणण्यासाठी एक पथक मध्य प्रदेशला शनिवारी रवाना झाले आहे. त्यामुळे इंदूर येथील आश्रमाबाहेर आसाराम बापू समर्थकांनी गर्दी केली आहे.