पुणे विद्यापीठात बहिस्थ प्रवेश परिक्षेसाठी विशेष कक्ष

puneपुणे, – पुणे विद्यापीठात बहि:स्थ पद्धत सुरुच राहणार असून, या विद्यार्थ्यांसाठी मएक्स्ट्रनल इम्प्लीमेनटेशन सेलम हे विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ वासुदेव गाडे यांनी दिली़

विद्यापीठाच्या बहि:स्थ प्रवेशाच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेची विशेष सभा बोलावण्यात आली होती़ या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना डॉ़ गाडे म्हणाले, मविद्यापीठाची बहि:स्थ पद्धतीत गुणवत्ता आणण्यासाठी काही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. बहि:स्थ विद्यार्थ्यांचे प्रवेश, त्यांचे इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी विशेष सेल उभारण्यात येणार आहे. याशिवाय एक सॉफ्टवेअरही तयार करण्यात येणार आहे़ गुणवत्ता वाढविणे हे आमच्या समोरचे आव्हान आहे़ आणि या नवीन बदलांमुळे हे आव्हान आम्ही सक्षमपणे पेलू शकू, असा विश्‍वास आहे़

विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांमध्ये त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जागांचा विचार करून संबंधित महाविद्यालयांमध्ये बहि:स्थ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, विद्यार्थी यावर लक्ष ठेवण्यासाठीही यंत्रणा उभारण्यात येणार असून, एका महिन्याच्या आत या प्रवेश प्रक्रिया सुरु होतील, असे डॉ़ गाडे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment