सलमानच्या घराबाहेर दोन महिलांचा गोंधळ

सिनेमात काम मिळवण्यासाठी सलमानच्या घराबाहेर फे-या मारणा-या मायलेकींनी त्याच्या घराबाहेर गोंधळ घातला. दिल्लीहून आलेल्या या दोघी मायलेकींनी सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीला सिनेमात काम करायचे होते, मात्र तिची सिनेमात काम करण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तिची निराशा झाली. त्या भरात तिने आईसह सलमानच्या घराबाहेर गोंधळ घातला.

यावेळी दोघींनी सलमानच्या नावाने खडे फोडत दोघींनी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. एवढेच नव्हे तर रस्त्यावरच्या येणा-या जाणा-यांना आणि पोलिसांनाही त्यांनी सोडलं नाही. सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. तेव्हा त्यांनी आपला राग इतरांवर काढला.

एवढेच नव्हेर तर या दोघीच्या कारने पोलिसांच्या मोटारसायकलला धडक सुध्दा दिली. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली असून दोघींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment