रणबीर-कैटरीना साथ साथच

बॉलिवूडची रणबीर-कैटरीना ही प्रसिध्द जोडगोळी पडद्यावर आणि पडद्याबाहेरही साथ साथच आहे. रणबीर-कैटरीनाने स्पेनमध्ये घालवलेल्या सुट्टीची छायाचित्रे आणि त्यावरून उठलेला चर्चा सुरू असताना पुन्हा एकत्र श्रीलंकेत सुट्टीसाठी गेले असून ते गुप्तपणे त्यांनी अमलातही आणले आहे. श्रीलंकेतील कैटरीनाची सुट्टी आणि रणबीरचे शुट संपल्यानंतर ते दोघेही अनुराग बसूचे दिग्दर्शन असलेल्या ‘जग्गा जासूस’ या सिनेमात एकत्र काम करणार आहेत.

‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमानंतर रणबीर-कैटरीना ‘जग्गा जासूस’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ही झाली पडद्यावरची गोष्ट तर पडद्याबाहेरही ते दोघे एकत्र आले आहेत ते श्रीलंकेत. सध्या अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या सिनेमाचे शुट सध्या् श्रीलंकेत सुरू आहे. कैटरीनाही तिथे रणबीर आणि अनुष्का शर्माबरोबर सुट्टी घालवण्यासाठी पोहोचली, मात्र या भेटीगाठीबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

रणबीर- कैटरीना वारंवार एकत्र दिसत असल्याने त्यांच्या प्रेमाची चर्चा रंगत आहे. प्रत्यक्षात ते दोघेही आपण प्रेमात असल्याचे कबूल करायला तयार नसल्यानेच माध्यमे त्यांच्यामागे हात धुवून लागली आहेत. अशी छायाचित्रे प्रसिध्द झाली तर समकालीन कलाकारांच्या तुलनेत आपली पत घसरेल, या भितीने या दोघांनी कमालीची गुप्तता पाळण्याचे ठरविल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.

श्रीलंकेतील कैटरीनाची सुट्टी आणि रणबीरचे चित्रीकरण संपल्यानंतर ते दोघेही अनुराग बसूचे दिग्दर्शन असलेल्या ‘जग्गा जासूस’ या सिनेमात एकत्र काम करणार आहेत. या सिनेमातील नायिकेच्या भूमिकेसाठी कैटरीनाला विचारणा करण्यात आली आहे. तर हा सिनेमा अनुराग बसू आणि रणबीरची संयुक्त निर्मिती असल्याने नायक म्हणून रणबीरचे नाव निश्चित झाले आहे. या सिनेमाच्या शुटसाठी पुढचे वर्ष उजाडणार आहे.

Leave a Comment