नेफ्रोप्लस डायलिसिस यंत्रांचा विस्तार करणार

पुणे : रुग्णांना डायलिसिसची दर्जेदार सेवा देणारी ने़ङ्गˆोप्लस इंडिया महाराष्ट्रात सेवा विस्तार करणार असून चालू आर्थिक वर्षात पुणे, नागपूर आणि औरंगाबादमध्ये केंद्र सुरू करणार असल्याची माहिती संस्थापक आणि मुख्याधिकारी विक्रम वुप्पाला यांनी दिली.पहिल्या टप्प्यात पुण्यात आणि येत्या सहा महिन्यात नागपूर आणि औरंगाबादमध्ये केंद्र सुरू केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

सध्या देशातील आठ राज्यात ही सेवा दिली जाते. त्यात दिल्ली, हरियाना, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ यांचा समावेश आहे. त्यासाठी माक्स हॉस्पिटल समूहाशी करार केलेला आहे. देशात सध्या एकूण १७ केंद्रे आहेत. आलेप्पीमध्ये ‘सुट्टीवर या आणि डायलिसीस करा’ अशी अभिनव कल्पना राबविली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. असेही वुप्प्पाला यांनी सांगितले.

या संस्थेकडे प्राथमिक टप्प्यात २५ कोटी रुपये भांडवल जमा झाले आणि त्यातील १३ कोटी गुंतवण्यात आले. येत्या सहा ते नऊ महिन्यात आणखी दीड कोटी डॉलर गुंतवले जाणार आहेत.
सध्या कंपनीत ३५० कर्मचारी काम करत आहेत मात्र कुशल मनुष्यबळ मिळण्यात अडचण येते. ही अडचण लक्षात घेऊन कंपनीने पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेशी प्रशिक्षणाबाबत सहयोगाचा करार केला आहे. या करारानुसार सिंबायोसिसने नेफ्रोप्लसच्या सहकार्याने डायलिसिसचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे अशीही माहिती देऊन वुप्पाला यांनी दिली.

कंपनीचे एक संस्थापक कमल शहा हे स्वतः रुग्ण आहेत. चांगली सेवा मिळणे किती गरजेचे आहे हे लक्षात आल्याने त्यांनी कंपनी सुरू केली. भारतीय उपखंडातील अनेक देश तसेच पश्चिम आशिया आणि आङ्ग्रिकेत अशा प्रकारच्या सेवेची गरज आहे, त्या देशात विस्ताराचा विचार आहे. मात्र विश्वासू पुरवठादार नाहीत अशी खंत वुप्पाला यांनी व्यक्त केली.

देशात येतात कालबाह्य मशीन

डायलिसीस करण्यास वापरली जाणारी चांगली यंत्रे आयात करायची झाल्यास त्यांची खरी किंमत सहा लाख रुपये पडतेे. पण भारतात चांगली यंत्रे आयात केली जात नाहीत. ब्रिटन किंवा अमेरिकेत या यंत्रांचा पाच वर्षे वापर झाला की ती फेकून दिली जातात. तिथे वापरून कालबाह्य झालेली ही यंत्रे आपल्याकडे आणली जातात. देशातील काही व्यापारी आणि तंत्रज्ञ ती आयात करतात आणि त्यात बदल करून रुग्णालयांना सरासरी दोन लाख रुपयांना विकतात. अशी यंत्रे भारतात पाठविणे बेकायदा असूनही सरकार त्याकडे लक्ष देत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली